Breaking News

फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारांना….ते विकेट गेल्याचे सांगतायत आम्ही फसवलं पण तुम्ही का फसलात ? फडणवीसांवर पलटवार

एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच अचानक पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्या मागे नेमके कोणं होतं याची उत्सुकता अद्यापही राज्यातील जनतेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना ते सरकार शरद पवार यांच्या समंतीनेच आणि चर्चेतूनच स्थापन झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत गुगली बॉलवर विकेट कोणी देत असेल तर त्याची विकेट काढायची नाही का? असा प्रतिसवाल करत विकेट गेलेला कधी सांगतो का ? माझी विकेट घेतली म्हणून असा खोचक टोला लगावला.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे डबल गेम खेळले असा आरोपही केला. याविषयी शरद पवारांना विचारलं असता मी डबलगेम केला असं ते म्हणत असतील तर ते यात का फसले? असा प्रतिसवालही केला.

पहाटेच्या शपथविधीच्या आधी आमची बैठक शरद पवारांसह झाली. त्यानंतर दोन ते चार दिवसांनी शरद पवारांनी भूमिका बदलली असं फडणवीस म्हणाले.

यावर शरद पवार म्हणाले, २०१४ चा विषय तुम्हाला आठवतोय का? त्यावेळी निवडणूक झाल्यानंतर मी सांगितलं होतं की बाहेरुन पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही. आम्हाला काही फडणवीसांचं कौतुक नव्हतं. पण त्यांच्यात आणि त्यांच्या मित्रामध्ये(शिवसेना) कसं अंतर पडेल यासाठी आम्ही ते केलं. त्यानंतरच्या काळात जे सांगितलं की भेट झाली ती गोष्ट खरी आहे. त्यानंतर ते स्वतःच म्हणाले की दोन दिवसात शरद पवारांनी भूमिका बदलली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, जर दोन दिवसांमध्ये मी भूमिका बदलली तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांनी शपथ का घेतली? काय कारण होतं? शपथविधी चोरुन घेतली पहाटे? जर फडणवीसांना खात्री होती पाठिंबा नाही तर हे करायची आवश्यकता नव्हती. पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर जर आमचा पाठिंबा होता म्हणतात तर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार राहिलं का? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. याचा स्वच्छ अर्थ हा आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची पावलं होती ती पावलं समाजासमोर यावीत यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या असेही स्पष्ट केले.

फसवलं या फडणवीसांच्या आरोपावर बोलताना शरद पवार म्हणाले, आम्ही फसवलं असं आता फडणवीस म्हणत आहेत माझा प्रश्न आहे फसले का? उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला तर लगेच शपथ घ्यायला याल का? मोदींचा यात काही संबंध नाही. सत्तेशिवाय करमत नव्हते ते राज्यातले नेते होते. भेट झाली होती. मी याआधीही सांगितलं. आजही भेटलो होतो त्याचा अर्थ असा होत नाही की अशा काही गोष्टी असतात. सत्तेशिवाय त्यांची अस्वस्थता होती ती लोकांसमोर आणली. आमच्या चर्चा सगळ्या झाल्या. काही करुन त्यांना आमची मदत हवीच होती. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय गोष्टी घडतात का? असा उपरोधिक टोलाही लगावला.

मी दोन ते तीन दिवसात माघार घेतली होती असं ते म्हणत आहेत तर त्यांनी शपथ का घेतली?” हा शरद पवारांचा डाव होता असा अर्थ काढायचा का? असं विचारल्यावर शरद पवार म्हणाले, तुम्हाला जो काही अर्थ काढायचा आहे तो काढा. हा डाव होता की नाही मला माहित नाही. माझे एक सासरे होते, त्यांचं नाव सदू शिंदे. ते गुगली बॉलर होते. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या. मी क्रिकेट खेळलो नव्हतो तरीही गुगली कसं टाकायचं मला माहित होतं. त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे. अजित पवारांना नामुष्की सहन करावी लागली असं फडणवीस म्हणाले असतील पण त्यांची विकेट गेली हे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे लोक सत्तेसाठी किती पुढे जाऊ शकतात हे दाखवून दिलं असा खुलासाही केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *