Breaking News

आटोपशीर भाषणात शरद पवार म्हणाले, .. परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी शिर्डी येथील शिबिरास आवर्जून हजेरी लावली. त्यासाठी काही वेळासाठी शरद पवार यांनी ब्रीच कॅण्डी रूग्णालयातून सुटी घेतली. शिबीराची सांगता झाल्यानंतर शरद पवार पुन्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाले. भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार म्हणले, मी आज फार काही बोलू शकणार नाही. पण जी काही भूमिका मांडायची आहे ती थोडक्यात मांडेन अन् उर्वरित भाषण दिलीप वळसे-पाटील हे वाचून दाखवतील असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, आजच्या शिबिरातून एक चांगला संदेश राज्यात जात आहे. लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे असा विश्वासही व्यक्त केला.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले.

राष्ट्रवादीचे उत्तमरीत्या शिबीर झाले आहे. अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी हॉस्पिटलमध्ये मिळाली. शिस्तबध्द पध्दतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटील यांनी आयोजित केले त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

या शिबिराला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता पुढे युवक, युवती, महिला, सर्व सेलचे घटक काम करत आहेत. त्यांचेही स्वतंत्र शिबीर आयोजित करणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.

हॉस्पिटलमध्ये सर्वच भाषणे ऐकली असं नाही पण काहींची ऐकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा – पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यानंतर मला काम करता येणार आहे असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *