Breaking News

मनोज जरांगे पाटील गंभीर आरोप करत म्हणाले, माझा बळी हवाय, मग सागर…

राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीनुसार राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र ईडब्लूएस अर्थात अल्प उत्पन्न गटाखालील प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव एकमताने पारित केला. तत्पूर्वी सगेसोयऱ्यांनाही आऱक्षणाचा लाभ देण्याविषयीचा स्वतंत्र दुरूस्तीची अधिसूचनाही पारित केली. त्यानंतरही अंतारावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अधिसूचना मंजूर करा आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागणीवरून उपोषणाचे हत्यार उपसले. या उपोषण आंदोलनाचा आजचा १६ दिवस आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत माझा बळीच हवाय ना मग मी आलोच सागर बंगल्यावर असा निर्वाणीचा इशारा देत एकतर माझा बळी घ्या नाहीतर मला जेलमध्ये टाका असे गंभीर आव्हानही देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्यात मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेले १६ टक्के आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र ते सत्तेवरून जाताच मराठा समाजाला दिलेले आरक्षणही गेले. तसेच उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण घालविण्यासाठी त्यांचीच येडी माणसे न्यायालयात जातात आणि दिलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करतात असा गंभीर आरोपही केला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर आरोप करताना म्हणाले, मुंबईत फडणवीसांशिवाय पानही हलू शकत नाही. त्यामुळेच त्यांच्या सांगण्यानुसारच सर्व गोष्टी होत असतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंगेश चिवटे हे सातत्याने मराठा आंदोलकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. परंतु त्यांनाही आता फडणवीसांक़ून रोखले जात असल्याचा आरोप केला.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा असल्यानेच आणि आमच्या समाजात फूट पाडण्यासाठी मध्यंतरी एकाला आमच्यासोबत पाठविले आणि माझ्यावर बिनबुडाचे आरोप लावण्यात आले. जेणेकरून मराठा समाजात फूट पडावी आणि आरक्षणाचे आंदोलन संपावे यासाठी ही कटकारस्थाने करण्यात येत आहेत. एकाबाजूला त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्यांकडून मराठ्यांच्या विरोधात ओबीसींचा वापर सुरु करण्यात आला आहे. तर दुसऱ्याबाजूला समाजासमाजामध्ये फूट पाडण्याचे काम दुसऱ्याबाजूला फडणवीसांनी सुरु केले असल्याचा गंभीर आरोपही केला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझा बळी हवा असल्यानेच कधी पोलिसांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. तर आता सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी सलाईन काढून टाकली असून तुम्हाला माझा बळीच घ्यायचा असेल तर असा उपोषणाला बसवून मला मारण्यापेक्षा मीच तुमच्या सागर बंगल्यावर येतो असा इशारा देत एकतर माझा बळी तरी घ्या किंवा मला जेलमध्ये तर आत टाका असा निर्वाणीचा इशारा देत उपोषण स्थळावरून जरांगे पाटील यांनी उठून उभे राहिले.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत यावेळच्या निवडणूकीत तुमचा सुफडा साफ झाला म्हणून समजाच असे राजकिय आव्हानही यावेळी दिले. तसेच सागर बंगल्यावर आपण एकटेच जाणार असून माझ्यासोबत कोणीही येऊ नका, मी एकटाच जाणार एकतर मी सगेसोयरे अंमलबजावणीचा गुलाल तरी आणणार नाही तर माझं शरीर तरी येथे येईल असे सांगत उषोषणस्थळावरून उठून गेले.

यावेळी उपस्थित मराठा समाजातील सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचे आणि समजाविण्याचे प्रयत्न सुरु केले. तसेच गाडीत बसून मुंबईकडे निघण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत त्यांचे वाहन रोखून धरले. शेवटी जरांगे पाटील यांनी गाडीतून उतरून पायी चालत मुंबईला जाणार असल्याचे जाहिर केले. परंतु त्यांची तब्येत अचानक बिघडायला लागल्याने मनोज जरांगे पाटील रस्त्यातच अचानक बसले. पुन्हा जरांगे पाटील यांच्यासाठी त्यांची गाडी मागविण्यात आले आणि त्या गाडीत बसून सागर बंगल्यावर नेण्याची सूचना त्यांच्या वाहन चालकास केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *