Breaking News

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी बदलली स्ट्रॅटेजी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवरून मराठा समाजाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी साधारणतः पाच महिन्यापूर्वी आंदोलन पुकारत राज्य सरकारकडे काही मागण्याही मांडल्या. त्यातील काही मागण्या मान्य झाल्या तर काही मागण्या अद्याप झाल्या नाहीत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश आपल्याला सलाईनमधून विष प्रयोग करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला.

याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात उमटले. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मराठा समाजाचे अनेक उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाही केली. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या निवडणूक स्टॅट्रेजी बदलत प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात गाव पातळीवर आता अनेक नाही तर मराठा समाजाचा एकच उमेदवार देण्यात येणार असल्याचे घोषणा करत ३० मार्चपूर्वी हे उमेदवार अर्ज भरणार असल्याची घोषणा केली.

जालना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ अंतरवली सराटी गावात राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या सभेला संबोधित करताना सांगितले. .

तसेच मनोज जरांग पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दबाव आणण्यासाठी ३० मार्चपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडण्याचे आवाहन समाजाच्या नेत्यांना केले.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील १७-१८ लोकसभा मतदारसंघांवर मराठा समाजाचे वर्चस्व असून त्यांच्या प्रभावाने ते मुस्लिम, दलित समाज आणि समाजातील व्यापक वर्गाचा पाठिंबा मिळवू शकतात, असा दावाही यावेळी केला.

राजकारणात प्रवेश करणार की नाही याबाबत सातत्याने विचारण्यात येत असलेल्या चर्चेवर जाहिर सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला राजकारण माहित नाही आणि मला त्यात रस नाही, असेही यावेळी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार हाताळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, मनोज जराांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन चिघळविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्यांनी वापरलेल्या डावपेचामुळेच आरक्षणाचे आंदोलन लांबल्याचा आरोपही करत आरक्षणाच्या मागणीच्या प्रश्नी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, ते त्यांच्याचमुळे त्यामुळे आपण गुन्हे दाखल केल्याचा निषेध करतो असेही यावेळी जाहिर केले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा भाजपाचा सुफडा साफ करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यात आता लोकसभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा समाजातील अपक्ष उमेदवार जिल्ह्यातून उभारणार आणि ते नेमकी कोणाची मते खाणार याकडे राजकिय विश्लेषणांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *