Breaking News

अशोक चव्हाण टीका करताना सनी देओल स्टाईल म्हणाले, फक्त “तारीख पे तारीख” शिदें-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र

राज्यातील गंभीर प्रश्नांवर आरक्षणावर फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याची उपरोधिक फिल्मी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेप्रकरणी सातत्याने तारीख पे ताऱीख दिली जात आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकिय आरक्षण, धनगर आरक्षण प्रश्नी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडून फक्त तारखा जाहिर करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली.

अशोक चव्हाण म्हणाले, बंडखोर आमदारांविरूद्धची कारवाई, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, धनगर आरक्षण अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर ठोस निर्णय किंवा कार्यवाही होण्याऐवजी केवळ पुढील तारीख जाहीर केली जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचा सांगितले.

तसेच अशोक चव्हाण यांनी समाज माध्यमांवर एक मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, “तारीख पर तारीख मिलती है… लेकिन इन्साफ नहीं मिलता माय लॉर्ड, इन्साफ नहीं मिलता! मिली है तो सिर्फ ये तारीख”, या दामिनी चित्रपटातील सुपरहिट डायलॉगमधून अभिनेते व आज भाजपाचेच खासदार असलेले सनी देओल यांनी आपला उद्वेग व्यक्त केला होता. तशीच काहीशी वेळ आज महाराष्ट्राच्या नागरिकांवर ओढवली आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी, मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण, अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांना अलिकडेच एकच उत्तर मिळतंय. ते म्हणजे “तारीख पे तारीख”. अशी मार्मिक टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *