Breaking News

आगामी निवडणूकीसाठी शिवसेनेच्या अनेक विभागप्रमुखांवर गडांतर येणार अनेकांच्या नावाची यादी तयार

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका लक्षात घेवून पक्षांतर्गंत साफसूप करण्याच्या हालचालींना शिवसेनेत वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आपली सत्ता आबादीत राखण्यासाठी शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी विद्यमान अनेक विभागप्रमुखांना नारळ देण्याचा निर्णय घेतला असून पहिली कुऱ्हाड ताडदेवचे विभाग प्रमुख अरविंद ( अरूणभाई) दुधवडकर यांच्यावर कोसळणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत अनेक ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांना आस्मान दाखवित भाजपचे अनेक उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे शिवसेनेचा दबदबा मुंबईवर अद्याप असतानाही राजकारणात हा पराभव स्विकारवा लागला. त्यामुळे या गोष्टीची पुर्नरावृत्ती नको या अनुषंगाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला. त्यानुसार पक्षाची पत वाढविण्याऐवजी वैयक्तीक (आर्थिक) पत वाढविण्या विभागप्रमुखांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीने प्रत्येक विभाग प्रमुखाची वैयक्तीक माहिती जमा करण्याचे काम पक्षीय पातळीवर सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत ईशान्य मुंबईतील कोरगांवकर यांची नव्याने विभागप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली असून राजेंद्र राऊत यांच्यासंदर्भातही मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर तक्रारी गेल्या आहेत. अभिजित आडसूळ यांचीही उचलबांगडी करण्यात आली असून अन्य विभागातील विभागप्रमुखांवर लवकरच कुऱ्हाड कोसळणार आहे. मुंबई महानगरातील विभागप्रमुखानंतर राज्यातील जिल्हानिहाय, तालुका निहाय आणि शहर निहाय विभाग प्रमुखांचीही उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *