Breaking News

अखेर राम कदम यांचा माफीनामा वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी ट्वीट करत कदमांची माफी

मुंबई : प्रतिनिधी

‘तुम्हाला आणि तुमच्या आई-वडीलांना मुलगी आवडली तर मला सांगा, मी तीला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो‘, असे दहीहंडीच्या कार्यक्रमात जाहीर वक्तव्य करत भाजपचे आमदार राम कदम यांनी तरूणाईची वाह वा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद सामाजिक आणि राजकिय वर्तुळात पडले. तसेच ठिकठिकाणी कदम यांच्या विरोधात निदर्शने होत असल्याने अखेर कदम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आज माफी मागत  यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महिलांविषयीअनुद्गार काढल्याने राज्याच्या सर्वच भागातून राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे राज्याच्या महिला आयोगानेही दखल घेत याप्रकरणी सात दिवसाच्या आत निवेदन सादर करण्याचे आदेश कदम यांना दिला. याशिवाय भाजपच्या पक्ष नेतृत्वानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेत राम कदम यांना त्या दिवसाचा व्हीडीओ सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे अखेर राम कदम यांनी वक्तव्यप्रकरणी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु सामाजिक आणि राजकिय वर्तुळातील रोष कमी झाला नाही. त्यामुळे अखेर कदम यांनी माफी मागत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी ट्वीट करताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकिय हेतूने त्याचा प्रसार करण्यात आला. तसेच माझी राजकिय प्रतिमा डागळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही माझ्या वक्तव्यामुळे माता-बहिणींच्या भावना दुखावल्या असतील मी माफी मागतो असे ट्वीट करत कदम यांनी याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.   

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *