Breaking News

भ्रष्टाचाराची तक्रार करायला गेलेल्या किरीट सोमयांचा शिवसैनिकांमुळे काढता पाय संचेती रूग्णालयात जावू केली तापसणी

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांचे कथित भागीदार सुजित पाटकर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविण्याचा आरोप करत त्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर पुणे महापालिकेत गेलेल्या सोमय्या गेले. मात्र तेथे आधीच हजर असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांकडून सोमय्यांना शिवसैनिकांपासून बचावण्याच्या प्रयत्नात ते पायऱ्यांवर पडले. त्यामुळे अखेर शिवसैनिकांच्या पावित्र्यामुळे सोमय्यांनी काढता पाय घेतल्याचे पाह्यला मिळाले.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केल्यानंतर ते महापालिकेच्या आयुक्तांना तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेत गेले होते.  त्यावेळी सदरची घटना घडली.

शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केलं आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं ट्वीट सोमय्या यांनी केलं आहे. दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकार तुमचे आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा सवाल त्यांनी केला.

दुसरीकडे, सोमय्या हे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला. इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले. तर काहींनी त्यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. एक महिला तर सोमय्या यांच्या गाडीवर चप्पूल फेकून मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल निर्माण होत आहे..

दरम्यान शिवसैनिकांनी आपण किरीट सोमय्या यांना अर्ज देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी ईडीची चौकशी लावावी, सीबीआय चौकशी लावावी पण असे खोटे आरोप करू नयेत याविषयीचा अर्ज देण्यासाठी आलो होतो. तसेच सोमय्या यांच्यावर आम्ही कोणत्याही पध्दतीचा हल्ला किंवा त्यांच्या अंगावर गेलो नसल्याचे शिवसैनिकांनी दावा केला. या घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी संचेती ह़ॉस्पीटलमध्ये जावून स्वत:च्या प्रकृतीची तपासणी करून घेतली.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *