राज्यातील संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांना पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही असा सवाल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा कलम ३२ अन्वये विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली. त्यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदरची नोटीस फेटाळून लावली. त्यानंतर उफमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत बोलताना संभाजी भिडे हे आमच्यासाठी गुरुजी आहेत काही अडचण आहे का असा सवाल उपस्थित केला.
त्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी एकच गोंधळास सुरुवात केली. या गोंधळाच देवेंद्र फडणवीस यांनी आपले निवेदन पूर्ण केले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी यांना कोणतीही सुरक्षा पुरविली नाही. त्यामुळे संभाजी भिडे गुरूजी हे सरकारी सुरक्षेत फिरत आहेत असे म्हणणे चुकिचे ठरेल असे स्पष्ट केले.
त्यावर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अमरावतीच्या आमदार अॅड यशोमती ठाकूर यांनी हे कसले गुरूजी आहेत असा सवाल केला. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ते महिला आमदारांना जीवे मारण्याची धमकी देतात, ते कसले गुरुजी असा सवाल केला. हेच का तुमचे हिंदूत्व असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यासाठी ते भिडे गुरूजी आहेत. पण यापूर्वी जाहिर केल्याप्रमाणे देशाच्या महापुरुषांचे अवमान करणारे वक्तव्य खपवून घेणार नाही. त्यानुसार संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीत आयपीसी १५३ अन्वये कलम ३४ अन्वये आणि मपोका खाली १३५ खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमरावतीत भाषण केल्याचा कोणतेही रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या आवाजाचे सँम्पल पोलिसांनी घेतले आहे. तसेच सध्या जे व्हारल स्वरूपात फिरत आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणाची क्लिप फिरत असल्याचा दावाही केला.
याशिवाय देवेंद्र फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस तपास करण्यात येत आहे. गुन्हा सिध्द झाल्यानंतर संभाजी भिंडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील काँग्रेस पक्षाकडून चालविण्यात येणाऱ्या शिदोरी या मासिकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जेणेकरून शिदोरी मासिकातून स्वा.सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करत ते गे होते, ब्रिटीशांचे हस्तक होते, तसेच ब्रिटीशांचे माफीवीर साक्षीदार होते अशा पध्दतीची शेरेबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शिदोरी या मासिकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जाहिर केले.
संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुठल्याही महापुरुषाविरुद्ध कुणी अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या… pic.twitter.com/rCGeFzJjmU— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 2, 2023