Breaking News

अजित पवार यांचे आव्हान, महायुतीत सहभागी व्हा पत्र खोटं निघालं तर संन्यास घेईन… लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी बीडऐवजी कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजित पवार आणि काही लोकांनी वेगळा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमच्यावर कसला दबाव होता अशी चर्चा सुरु होती. परंतु आमच्यावर लोकांचा दबाव होता. तसेच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत असताना आम्हाला पत्र पाठविण्यात आलं की महायुती सरकारमध्ये सहभागी व्हा म्हणून हे पत्र जर खोटं निघालं तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे खुले आव्हान पक्षांतर्गत आव्हान दिले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मागील दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात जी काही लोकांची कामे आहेत ती कामे पूर्ण करायची होती. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायची होती. त्यासाठी आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकांचा आमच्यावर काम करण्याचा दबाव होता. त्या दबावा पोटी सरकारमध्ये सहभागी झाल्याचा खुलासा केला.

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, काही जण म्हणतात आमच्यावर गुन्हे दाखल होणार असल्यानेच आम्हाला महायुतीत गेलो असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मी कोणालाही घाबरत नाही. मी असा एखाद्या गोष्टीसाठी घाबरून जाणाऱ्यातला नाही असे सांगत केवळ फक्त लोकांच्या भल्यासाठी वेगळा निर्णय घेतल्याचेही सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, आज राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. राज्य सरकार आपल्यासोबत आहे. वेळ पडली तर केंद्र सरकारकडून मदत घेता येईल. आज रंकाळ्याची अवस्था काय झाली आहे. रंकाळा तलावाचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी लागेल तो निधी द्यायला आपण तयार असून वेळ पडली तर केंद्राकडून आर्थिक मदत घेता येईल, असे सांगत आम्ही लोकांचा विकास करण्यासाठीच महायुतीत सहभागी झाल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

दरम्यान, कोल्हापूरात अजित पवार हे पोहोचल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *