Breaking News

अजित पवार म्हणाले, डिग्रीवर काय आहे… पंतप्रधानांच्या डिग्रीवरून विरोधकांच्या भूमिकेवरून अजित पवारांचा टोला

नपुसंक सरकार असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे ते मिडियात ऐकले आणि वर्तमानपत्रात वाचले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या शब्दाचा वापर करावा तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. परंतु आम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करतो. सरकारमध्ये कुणीही असले तरी ते महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेचे सरकार असते. तसे देशाचे पंतप्रधान एकशे पस्तीस कोटी जनतेचे असतात. त्यामुळे बाहेर गेल्यावर आपल्या पंतप्रधानांबद्दल मी आदरानेच बोलत असतो असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून नवा वाद निर्माण झाल्याप्रश्नी बोलताना अजित पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांची २०१४ ला डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का? त्यांनी देशात स्वतः चा करिष्मा निर्माण केला. जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता असा टोला लगावतानाच याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले पाहिजे असेही सांगितले.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, डिग्रीवर काय आहे आतापर्यंत सुरुवातीपासून देशाचे पंतप्रधान झाले, अनेक मुख्यमंत्री झाले. आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून निवडून येणाऱ्याला महत्त्व आहे. बहुमत असेल तो प्रमुख होतो. त्यामुळे शिक्षणाच्याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रात पदवी झाल्याशिवाय काम करु शकत नाही. असे राजकारणात नाही त्यामुळे ते आज ९ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता डिग्रीचे काढले जाते हा महत्त्वाचा प्रश्न नाही. सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले . शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण सोडून देतो त्यामुळे डिग्री या विषयाला फार महत्व द्यावे असे मला वाटत नाही असेही म्हणाले.

आपण देशाला का मागे मागे नेतोय हेच कळेना… अभ्यासक्रमातून देशाचा इतिहास काढला तरी त्या इतिहासाची इतिहासात कायमची नोंद राहणार आहे ना. जो इतिहास आहे त्याला घाबरायचं काय… आहे तो आहे. कुठल्या विचारसरणीत आपण जगतो, राहतो आणि काय करतो मला कळायला मार्ग नाही. या विषयातून महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी केला.

पोपट घेऊन भविष्य बघणारा असतो ना… त्याचा तो पोपट बाहेर येतो आणि एक – एक पत्ता काढून हातात देतो तसे दिसलं की काय त्यांना… असा टोला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला.

आता सध्या जे सुरू त्याचे एकमेव कारण म्हणजे महागाई आटोक्यात आणता येत नाही, बेरोजगारी कमी करता येत नाही. उद्योगधंदे आणण्यासाठी जे पोषक वातावरण तयार व्हायला हवे ते होत नाही. कायदा व सुव्यवस्था आटोक्यात आणली जात नाही महिलांवर, मुलींवर भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. अरे हे काय चाललंय… ही मोगलाई आहे का? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.

रिक्षावाला शब्दावरून अजित पवार म्हणाले, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रिक्षावाला हा माझाच शब्द आहे पवार साहेबांचा नाही. मी पवारसाहेब यांचे नाव घेतले पण शब्द माझा… उध्दवजी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होते असे म्हटले होते, त्यामुळे हा वाद अरविंद सावंत यांनी क्लीअर केला असल्याचेही सांगितले.

Check Also

‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *