Breaking News

उपमुख्यमत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार म्हणाले, मागील ९ वर्षे पंतप्रधान मोदी यांच्या…. उपमुख्यमत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार म्हणाले, आम्ही पक्ष चिन्हासह राष्ट्रवादी म्हणून सरकारमध्ये...

राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत असतानाच आणि त्या शपथविधी मागे नेमकं कोण या बाबतची उस्तुकता अद्याप राजकिय वर्तुळात असतानाच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (२ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर जवळपास बहुसंख्य आमदार, सर्व पक्ष आहे. मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. मंत्रिमंडळात पुढे पुन्हा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो. सध्या देशाची आणि राज्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत आलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ९ वर्षे देशाला मजबुतीने पुढे नेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असं मत आलं. सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त बैठका होत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळ्या राज्यात वेगळी परिस्थिती आहे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

शरद पवार यांचा या सहभागी होण्याला पाठिंबा आहे का असा सवाल करताच अजित पवार म्हणाले, आम्हाला सगळ्यांचा आर्शिवाद आहे. आम्ही पक्षचिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असे स्पष्ट केले.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *