Breaking News

अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सभागृहातच धरले धारेवर, …चुकीची माहिती दिली…

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मागील दोन दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसकल्पावरील घोषणांवर आणि आर्थिक तरतूदींवर विधानसभेत सर्वपक्षिय आमदारांकडून चर्चा करण्यात आली. या चर्चेला आज अर्थमंत्री अजित पवार हे उत्तर देत असताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पिय खर्चातील आकडेवारीवरून अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत ब्रिफींग करताना जरा नीट माहिती देत चला. चुकीची आकडेवारीची माहिती देत जाऊ नका नाहीतर जर तुम्ही चुकीची माहिती दिलात तर तुम्हालाच बघुन घेईन असा दम दिला. त्यामुळे काही काळ सभागृहात चांगलीच खसखस पिकली.

अर्थसंकल्पिवरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी एकूण अर्थसंकल्पिय खर्च आणि सुधारीत अंदाजित खर्चाचे आकडे देताना ५ टक्केवाढीऐवजी १० टक्के वाढीव धरली. त्यामुळे राजकोषित तूट दाखविण्याच्या संख्येत वाढ झाली. या आकडेवारीतील तफावतीमधील फरक काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर अजित पवार म्हणाले की, माझ्याकडे तर तेच आकडे छापील असल्याचे सांगत हातातील पिंक रंगाची पुस्तिका सभागृहात दाखविली.

त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, जरा ब्रिफिंग घेणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नीट ब्रिफींग घ्यावे आणि आकडेवारीतील फरक लक्षात ठेवावा असा दम काँग्रेसच्या आमदारांकडे पाहून दिला.

त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी ब्रिफींग केले. त्या अधिकाऱ्यांनी आकडेवारीतील फरक आणि मुळ आकडेवारी या गोष्टी आमच्यासमोर ठेवल्या. तसेच आमच्याकडे जी माहिती असते त्याची फक्त आम्ही खातरजमा ब्रिफींग दरम्यान करून घेत असतो. त्यामुळे एकदा ज्यांनी काल कविता म्हटली आणि त्यास कुसुमाग्रजांचे नाव दिले त्यांच्याकडेही एकदा नीट डोळ्यांनी पहा आणि ज्यांची कविता होती त्यांच्याकडेही पहा असे सांगत अजित पवार आणि जयंत पाटील यांना चिमटा काढला.

त्यावर अजित पवार म्हणाले की, ब्रिफींग देणाऱ्यांनो ब्रिफिंग जरा नीट देत चला. चुकीची माहिती देत जाऊ नका. जर चुकीची माहिती देत असाल तर तुमच्याकडे एकदा बघतोच असा दमच अदृष्य गॅलरीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडे पहात दिला. तसेच सभागृहात काहीजण स्वतःला फारच शहाणे समजायला लागले असा उपरोधिक टोलाही लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *