Breaking News

उध्दव ठाकरेंच्या अपेक्षेनुसार निवडणूक आयोगाने “धनुष्य बाण” चिन्ह गोठवलं शिवसेनेकडून अंधेरी पोटनिवडणूकीत नव्या चिन्हाचा वापर

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेना आणि चिन्हावर दावा केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही शिवसेना आणि धनुष्य बाण आपल्याच गटाचे असल्याचा दावा केला. परंतु निवडणूक आयोगाकडून नियमानुसार दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर झाल्यानंतर आज दुपारी सुट्टी असतानाही आयोगाच्या वरिष्ठांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्य बाण हे चिन्ह अंधेरी पोटनिवडणूकीसाठी गोठविण्यात आल्याचा निर्णय जारी करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मज्जाव करण्यात आला आहे.

त्याचबरोबर नवे नाव आणि चिन्हासाठी दोन्ही गटांनी अर्ज करावेत अशा सूचना आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला केली.

विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कदाचीत आपले धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाईल याचे संकेत दिले होते. त्यानुसार आयोगाने चिन्ह गोठवल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ मागितली होती. परंतु निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला आज दुपारी १ वाजेपर्यत सादर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार शिवसेनेकडून सर्व कागदपत्रे आयोगाच्या नवी  दिल्लीतील कार्यालयात सादर करण्यात आली. तसेच ही कागदपत्र सादर केल्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यत अंतिम निर्णय देऊ नये अशी विनंती आयोगास केली होती. त्यानंतर दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जुलै महिन्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सांगितले होते की, कदाचित आपले धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला आगामी निवडणूका या नव्या चिन्हावर लढवाव्या लागतील असे भाकित वर्तवित त्यादष्टीने जे कोणते नवे चिन्ह मिळेल त्या चिन्हावर निवडणूका लढविण्याचे आणि चिन्ह सर्वदूर पोहोचविण्याची तयारी ठेवा असे आवाहन शिवसैनिकांना केले होते.

त्यामुळे पक्षाचे धनुष्यबाण गोठविले जाणार असल्याचा अंदाज शिवसेनेला अर्थात उध्दव ठाकरे यांना अंदाज होता. त्यानुसारच आयोगाचा निर्णय आला आहे. त्यामुळे यासंदर्भात पुढील रणनीती उध्दव ठाकरे यांच्याकडे आधीपासूनच तयार असण्याची शक्यता आहे.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *