Breaking News

अमित शाह यांच्या टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर,… ये डर अच्छा है नांदेड येथील सभेत उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या भाजपाकडून देशातील ३०० लोकसभा मतदारसंघात मोदी @ ९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमातंर्गत गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र या सभेत मोदी सरकारच्या काळात घेतलेल्या कामे सांगण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अमित शाह यांनी टीकास्र सोडलं. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, असा हल्लाबोल अमित शाहनी उद्धव ठाकरेंवर केला. अमित शाह यांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या टीकेला देताना म्हणाले, शिवसेना फोडली, तरी ये डर अच्छा है, असं खोचक प्रत्युत्तर दिले.

भाजपा तर्फे देशभरात ‘मोदी @ ९’ अभियान राबविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेड मध्ये पार पडली. तेव्हा बोलताना अमित शाह म्हणाले की, ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठं आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले.

तसेच पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, तीन तलाक, राम मंदिर, समान नागरी कायदा, मुस्लिम आरक्षण, वीर सावरकरांचा सन्मान करायचा की नाही, यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही उद्धव ठाकरेंना दिलं. यावर संजय राऊत यांनी अमित शाह यांचं भाषण मजेशीर असल्याचं म्हणाले आहे.

अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर… म्हणजे अजून ही मातोश्रीचा धसका कायम आहे.

शिवसेना फोडली, नाव आणि धनुष्यबाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले, त्यावर खरे तर भाजपाने त्यावर चिंतन करायला हवे. पण, ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय, असं संजय राऊतांनी सांगितले.

Check Also

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *