Breaking News

घराणेशाहीचा आरोपावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार,…सोयी प्रमाणे दिसते…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे आणि विश्वासू सहकारी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. मात्र या दोघांकडे जबाबदारी सोपविताना कोणत्याही राजकिय पक्षात महत्वाच्या मानण्यात येत असलेल्या पक्षांतर्गत निवडणूक समितीच्या प्रमुख पदाची सुत्रेही सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविण्यात आली.

विशेष म्हणजे नवी दिल्लीतील पक्ष संघटनेच्या कार्यक्रमाला स्वतः अजित पवार उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय पातळीवर अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाही. तर महाराष्ट्रात मुंबईत असलेल्या सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर निवड करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शरद पवारांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे.

याला सुप्रिया सुळे प्रत्युत्तर देत, होय मला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे, असं रोखठोक उत्तर दिलं.

सुप्रिया सुळे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. तर, महाराष्ट्रात छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर घराणेशाहीची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, होय, ही घराणेशाहीच आहे. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार याची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन त्यांच्याकडं असतात. असा उपरोधिक टोला ही विरोधकांना लगावला.

तसेच पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात माझा पहिला क्रमांक येतो, तेव्हा माझे वडिल संसदेत पास करत नाहीत. मला सातत्याने संसदरत्न मिळते, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे घराणेशाही दिसते, अशा शब्दांत विरोधकांना खडसावलं.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *