Breaking News

मुंबई

पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी म्हणाल्या, शरद पवारांना सांगूनच….. भाजपाने आश्वासन पाळले नाही म्हणून आम्ही परतलो

उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपात गेला होता. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचा डॉन आणि उल्हासनगरचे …

Read More »

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं …

Read More »

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ; सर्वाधिक कमी कालावधी मिळणार अवघे चार दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश

उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली. आता पर्यंत न्यायालयाच्या इतिहासात सर्वाधिक कमी कालावधी न्यायमुर्ती धानुका यांना मिळाला आहे. चार दिवसानंतर धानुका हे …

Read More »

वंचितच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला जखमी परमेश्वर रणशुर यास केईएम रूग्णालयात केले दाखल

२७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, नेहरुंचे नाव कोट्यवधी लोकांच्या मनातून कसे हटवणार नेहरु नावाची ऍलर्जी असल्यानेच हैदराबादमधील बँकींग संस्थेचे नामकरण

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अत्यंत घृणा आहे. नेहरु नावाची ऍलर्जीच त्यांना जडलेली आहे म्हणून नेहरुंची सातत्याने बदनामी केली जात आहे. पंडित नेहरु यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल

मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस आदेश जारी केले असून त्याविरोधात बॉम्बे कॅथोलिक सभेने एका सभा माहिम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. खाजगी संस्थेस किंवा व्यक्तीस दत्तक देण्याऐवजी शासन आणि पालिकेने या जागेच्या परिरक्षण करण्यावर सर्व वक्त्यांनी भर …

Read More »

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः कोकणचा सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी टक्क्याचा बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविणारे घटले मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या जास्त

सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण निकाल घटण्याबरोबरच यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले गुणवंत घटले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा …

Read More »