माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत जे केवळ घरातच बसून राहिले, त्यांना परफॉर्मन्स करणाऱ्या मंत्र्याबद्दलची माहिती काय असणार? त्यामुळे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राला ओळख घरबशा मुख्यमंत्री म्हणून झाली, तर देवेंद्र फडणवीस यांची ओळख परफॉर्मन्स मंत्री म्हणून झाली, असा घणाघात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
काल भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मस्टर मंत्री असा करतानाच, इंग्रजांनी मुंबईचा विकास केला. भाजपाने मुंबईसाठी काय केले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यामातून उत्तर दिले.
भाजपाने मुंबईसाठी काय केले हे तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे काका की मामा, असा संतप्त सवाल करतानाच, अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आता इंग्रजांचा उचकी लागली! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला. भाजपाने मुंबईसाठी काय केले? तुम्ही मुंबईवर २५ वर्षे राज्य केलेत. तुम्ही काय केलेत ते सांगा? आम्ही काय करतोय आणि काय केले हे मुंबईकरांना माहिती आहे. तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला म्हणाले.
जे केवळ स्वतः घरातच बसून राहिले, माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे जे कधी गेलेच नाही, त्याना परफॉर्मन्स करणाऱ्या मंत्र्याबद्दलची माहिती काय असणार? तुमची ओलख महाराष्ट्राला घरबशा मुख्यमंत्री म्हणून झाली आणि देवेंद्र फडणवीस यांची ओळख परफॉर्मन्स मंत्री म्हणून झाली, असा टोला शेलार यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांची गेल्या पंधरा वर्षांतील भाषणे पाहिली तर कधी याच्या छाताडावर नाच, कधी त्याच्या छाताडावर नाच, हाच त्यांच्या भाषणाचा गाभा राहिला आहे. पण ज्यांच्या ज्यांच्या छाताडावर नाचू असे म्हटले आहे, त्यांच्या सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर तेच गेले, असे टोला शेलार यांनी लगावला. ज्या नेत्याला स्वाभिमान नाही, सत्तेसाठी विश्वासघात करण्याचा ज्यांच्या सवभाव आहे, त्या नेत्यांच्या पंगतीतील अग्रणी नाव म्हणजे उद्धव ठाकरे, असा घणाघातही आशीष शेलार यांनी केला.
उद्धव ठाकरेंची ओळख महाराष्ट्राला घरबश्या मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांची ओळख परफॉर्मंस मंत्री अशी!@OfficeofUT @ShivSenaUBT_ @Dev_Fadnavis @BJP4Mumbai #BJP4Maharashtra#Maharashtra #Mumbai #BJP #UBT pic.twitter.com/PlCOMAaUza
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 7, 2023