Breaking News

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, लबाड लांडगा ढ्गाव करतंय आमचे सरकार आल्याबरोबर `टोल`बंद करणार

आमचे सरकार आल्यास मुंबईतल्या दोन्ही महामार्गावरील टोल बंद करणार असल्याचे आश्वासन ठाकरे गटाचे आंदार आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी त्यांनी दोन्ही महामार्गांचे मेंटनन्स महापालिका करते, तर टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे जात असल्याचे सांगत यात मोठा घोटाळ होत असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमएसआरडीसीचा टोल घोटाळा उघड केला. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्ग महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यांची देखभाल, डागडुजी महापालिका करत आहे. तरीही या दोन्ही मार्गावरील टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे जात आहे. या रोडवरील जाहिरातीचा पैसाही एमएसआरडीसीकडे जात आहे. ही फार मोठी रक्कम आहे, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. या दोन्ही मार्गांवरील टोलनाके बंद करा आणि तो पैसा महापालिकेला द्या, अशी मागणीच आदित्य ठाकरे यांनी केली.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पालिकेने या दोन्ही रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी आदी गोष्टी करायच्या आहेत. पालिकेच्या खर्चातूनच या गोष्टी होत आहेत. महापालिका मुंबईकरांकडून घेत असलेल्या कराच्या पैशातून या रस्त्याची डागडुजी आणि देखभाल केली जात आहे. मात्र या दोन्ही महामार्गांवरील टोल नाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे जाण्याचे कारण काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

या दोन्ही रस्त्यावर एमएसआरडीसी टोल का घेते, हा पैसा कुणाला दिला जातो असे प्रश्न करतानाच मुंबईकर आधीच महापालिकेला कर भरतात. त्यात टोलचा पैसाही मुंबईकर भरतात. मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? देशात सर्वाधिक कर मुंबईकर देत असताना त्यांची पिळवणूक केली जात आहे. या दोन्ही महामार्गांवरील टोलनाका आणि होर्डिंगचा पैसाही पालिकेला मिळायला हवा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईकर कर भरतोय. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील टोलनाका बंद व्हावा. कंत्राटदार तुमचे मित्र असतीलही तरीही त्यांच्याशी वन टाईम सेटलमेंट करावी. त्यासाठी महापालिकेचा पैसा घेता कामा नये. या रस्त्यावरील होर्डिंग्जमधून मिळालेला पैसा पालिकेला दिला पाहिजे, असे सांगतानाच कंत्राटदार त्यांचे मित्र नसतील तर त्यांनी टोलनाके बंद करावे, असे आव्हानच आदित्य यांनी दिले.

टोलनाके बंद व्हावेत यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही. कोर्टात जाणार नाही. कारण हे सरकार औटघटकेचे आहे. सरकार जाताच आमचे सरकार येणार आहे. त्याबरोबर आम्ही या दोन्ही मार्गांवरील टोलनाके बंद करू, अशी घोषणाही त्यांनी केली.

रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, बेस्टची परिस्थिती खराब झाली आहे. रायगडचा पालकमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. पण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू शकलेले नाहीत. मुंबई-नाशिकही खराब झाला आहे. मोठे मोठे खड्डे पडले आहेत, रस्ते चंद्रासारखे दिसायला लागले आहेत. तिथेही दुरुस्ती नाही. बेस्टचे हाल झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बैठका घेणे गरजेचे आहे. यातून मार्ग काढायचा कसा यावर चर्चा व्हायला हवी होती. पण त्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केली.

लबाड लांडगा ढोंग करतोय

टोल बंदची घोषणा करणाणाऱ्या आदित्य ठाकरेंवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आषीश शेलार यांनी निशाणा साधला. गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, २६ जुलैला तर अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले, तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते की, मुंबईकरहो तुम्हाला सेवा देण्यात आम्ही मी पडलो. तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा. आणि आज सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका. हे मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग आहे. लबाड लांडगा ढोंग करतोय आणि मुंबईच्या कैवाराचे सोंग करतोय, अले टीकास्त्र आशीष शेलार यांनी सोडले!

औषधांच्या नावावर लूट

मुंबई महापालिकेत औषधाच्या नावावर होत असलेल्या लुटीबद्दल गेली २० वर्षे आम्ही सातत्याने बोलत आहोत. मुंबई शहराची लोकसंख्या दीड कोटीच्या आसपास आहे. त्यातील ४०-४५ लाख मुंबईकर महापालिकेच्या रुग्णालयांत औषधोपचार घेतात आणि एका वर्षाला चार हजार कोटी खर्च होत आहेत. म्हणजे पाच वराषाला २० हजार कोटी खर्च होत आहेत. तरीही औषधे मिळत नाही. त्याची क्वॉलिटी योग्य नाही. टेस्ट होत नाहीत. या सर्वांची चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केल्यानेच आता चौकशी होत असल्याचे शेलार म्हणाले.

 

 

 

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *