जयंत पाटील आणि मी शरद पवारांसोबत आहोत. मी मरेपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. मात्र जयंत पाटील आणि माझ्याविषयी भाजपाशी सलगीच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. तशा चर्चा होणे म्हणजे आमचा मोठा आपमान आहे, असे शरद पवारांच्या विश्वासातले असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा रंगली. शिवाय जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. जयंत पाटलांसोबत जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. त्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी त्यांची खंत व्यक्त केली.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी कायम शरद पवार साहेबांसोबतच आहे. माझ्याबद्दल अशी चर्चा होणे हाच माझा मोठा अपमान आहे, असे म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, कुणीतरी जाणून-बुजून या सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहे. काही ब्लॉगर्स आहेत. ज्यांच्याकडून जयंत पाटील आणि माझ्याविषयी या सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. ते त्याचा असुरी आनंद सुद्धा घेत आहेत. पण आम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही. मरेपर्यंत आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहू, असे निर्धारपूर्वक सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे… pic.twitter.com/1wVpMBG2LZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 6, 2023