Breaking News

आरोग्य

रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या “या” कंपन्यावर कारवाई अपोलो फार्मसी आणि कंन्सेप्टरेन्युअर व्हेंचर वर कारवाई

Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई ही संस्था B.P.monitor या रक्तदाबासाठी वापरात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचे (Medical Devices) में विनापरवाना उत्पादन करत असल्याची माहिती प्रशासनास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे उक्त संस्थेच्या शाह इंडस्ट्रीयल इस्टेट देवनार, गोवंडी या ठिकाणी बृहन्मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून पडताळणी करण्यात आली. कारवाईचे वेळेस वरील …

Read More »

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी/नुतनीकरण ऑनलाईन होणार

प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. मुंबईतील कुपरेज येथे स्थित महाराष्ट्र राज्य नाविन्‍यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या …

Read More »

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दंत क्षेत्रास उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार : वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख

बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व …

Read More »

आरोग्य मंत्री टोपेंचे कोरोनाच्या चवथ्या लाटेबाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले… फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये

मागील दोन वर्षाहून अधिक काळ कोरोनाने संपूर्ण जगभरातच थैमान घातले. मात्र कोरोनामुळे वाढत्या लसीकरणामुळे कोरोनाला रोखण्यात चांगल्यापैकी यश आहे. तसेच अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. महाराष्ट्रासह देशातही कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आलेले असले तरी महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत धीम्यागतीने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे …

Read More »

आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा इशारा, पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरा कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा

राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर …

Read More »

खाजगी क्षेत्राची भागीदारी घेऊनच वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्यावर भर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचे उद्दिष्ट सन २०३० पर्यंत ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैद्यकीय सेवा क्षेत्राचे खाजगीकरण न करता सार्वजनिक खाजगी भागीदारीने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. राज्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी …

Read More »

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

मागील काही दिवसांपासून कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आल्यानंतर आता राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. आपार्श्वभूमीवर या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होवू नये या उद्देशाने आणि संरक्षण होण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर या वाढत्या तापमानामुळे उष्माघातास सामोरे जावे लागल्यास नागरीकांना मिळावयाच्या वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य …

Read More »

राज्य सरकारचे वराती मागून घोडे, हाफकीनमधील कोवॅक्सिन लस उत्पादनाला वेग देणार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लस उत्पादनाबाबतचा विचार

साधारणतः वर्षभरापूर्वी मुंबईतील हाफकिन इस्टीट्युटमधून कोविडवरील लसीची निर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली. त्यानंतर कोविड लस निर्माण कऱणाऱ्या कोवॅक्सीन कंपनीसोबत राज्य सरकारने सामंज्यस करारही करण्यात आला. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झाली नाही की केंद्र सरकारकडून निधी दिला गेला ना कोव्हॅक्सीनकडूनही कोणती हालचाल झाली. त्यानंतर सगळंच शांत झालं. …

Read More »

खबरदार, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकाल तर कडक कारवाई होणार - राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घोषणा

औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी Nitrosun (Nitrazepam Tablet) …

Read More »