Breaking News

खेळाडूंनी कशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी? हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच कार्डियाक अरेस्ट (एससीए) येणे होय

अनेकदा आपण तंदरुस्त खेळाडूंना देखील मैदानांध्ये, व्यायामशाळेत हृदय विकाराच्या झटक्याने जीव गमावताना पहिले आहे. इतके तंदरुस्त असून देखील खेळाडू खेळतानाच मूर्च्छा येणे किंवा अचानक हृदय विकाराचे झटके का येत असतील? याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजेच SCA समावेश आहे. हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच कार्डियाक अरेस्ट (एससीए) येणे होय, ज्याला सडन कार्डियाक डेथ (एससीडी) असे देखील म्हणतात. म्हणजे हृदय अचानक आणि अनपेक्षित, बहुतेकदा हृदयातील विद्युत खराबीमुळे होते. ज्यामुळे हृदयाची अनियमित आणि गोंधळलेली लय (अॅरिथमिया) होते. यामुळे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करण्यास असमर्थ ठरते, ज्यामुळे चेतना नष्ट होते आणि त्वरित उपचार न केल्यास मृत्यू होतो.

डॉ. कोमल पवार, सल्लागार हृदयरोग विभाग, एसआरव्ही रुग्णालय, चेंबूर, म्हणाल्या की, “क्रीडापटू, विशेषत: जे अधिक उच्च शारीरिक क्षमतेच्या खेळांमध्ये सहभागी असतात  त्यांना अनेक कारणांमुळे सीएसडीचा अल्प प्रमाणात धोका वाढलेला असू शकतो. काही क्रीडापटूमध्ये सडन कार्डियाक अरेस्टला अनुकूल असे सामान्य जोखीम घटक सुद्धा आहेत जसे की, निदान न झालेली किंवा उपचार न केलेली हृदयाची स्थिती आणि उत्तेजकांचे सेवन (उदा., कोकेन, अॅम्फेटामाइन्स) किंवा कार्यक्षमता वाढवणारी औषधे यासारख्या विशिष्ट पदार्थांचा वापर यांचा समावेश असल्यास सीएसडीचा धोखा उद्भवू शकतो.

पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या विद्युत वाहक द्रवामधील असंतुलन हृदयाच्या विद्युत सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि अरिथमियास कारणीभूत ठरू शकतो. धूम्रपान करणे, हृदयाच्या समस्यांचा कौटुंबिक इतिहास, मधुमेह, सी-प्रतिक्रियाशील प्रथिनांसारखे वाढलेली रक्तामधील दाहकता, जास्त प्रमाणात अल्कोहोल आणि कॅफेनचे सेवन, वाढलेले फॅटी ऍसिडचे प्रमाण आणि मनोवैज्ञानिक घटक संवेदनाक्षम व्यक्तींमध्ये ऍरिथमियास कारणीभूत ठरू शकतात.”सिकलसेल /सडन कार्डियाक अरेस्टच्या उपचारांमध्ये करण्याजोग्या गोष्टी म्हणजे जे आधी ते ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे, हृदयाच्या संरचनात्मक विकृतींचे मूल्यांकन करणे, प्राथमिक विद्युत विकारांचे निदान करणे, सिकलसेलच्या कौटुंबिक इतिहासाचे मूल्यांकन करणे आणि न्यूरोलॉजिकल आणि मानसिक पैलूंचा विचार करणे गरजेचे ठरते. क्रीडापटू किंवा अती शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्यांनी सहभागापूर्वी आपली तपासणी केली पाहिजे. त्यांनी हळूहळू त्यांच्या व्यायामाची तीव्रता वाढवली पाहिजे आणि त्यांच्या शारीरिक मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे. एखाद्याने क्षमतेच्या पलीकडे शारीरिक श्रम केल्याने हृदया संबंधित धोका वाढू शकतो..

Check Also

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *