Breaking News

आज होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा लिपस्टीक मर्डर , सिमर मराठी डब सिनेमांचा समावेश

गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत.

इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर? ‘लिपस्टिक मर्डर’ ची कथा या प्रश्नात पाडते तर हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याला त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहचवणे, परंतू त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.

“चित्रपट, वेब सिरीज, आणि अन्य कार्यक्रमांतून ‘अल्ट्रा झकास’ हा महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सातत्य ठेवत असून रसिक प्रेक्षकांचा आवडता ओटीटी बनला आहे. ‘अल्ट्रा झकास’वर आजवरच्या दर्जेदार चित्रपटांबरोबरच सप्टेंबर महिन्यात ‘लिपस्टिक मर्डर’ आणि ‘सिमर’ या दोन दर्जेदार रहस्यमय मराठी डब चित्रपटांचा समावेश करून आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहोत. आशा आहे कि या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आणि प्रेम मिळेल” अशी भावना अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. सुशीलकुमार अग्रवाल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात व्यक्त केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

टायगर आणि कृतीच्या ‘गणपत’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरवात प्रदर्शापूर्वी चर्चेत असलेला गणपत चित्रपटाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद

अभिनेता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *