Breaking News

सरकारी आरोग्य केंद्रांत वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची फिलिप्स कंपनीची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्य विषयक प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली. या बैठकीला नेदरलॅण्डचे राजदूत गुडिडो टिलमन, फिलिप्स कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी अभिजित भट्टाचार्य,माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

यावेळी मेझॉन म्हणाले, फिलिप्स कंपनीने यापूर्वी टी.व्ही.,रेडिओ आदी इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करुन जगभरचे मार्केट काबीज केले होते. आता या कंपनीने आरोग्य क्षेत्रात काम सुरु केले आहे. हॉस्पिटल मध्ये लागणारी वैद्यकीय उपकरणे उदा. सिटी स्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन, एमआरआय मशीन अशी अनेक उपकरणे तयार करुन पुरवतो. त्याच्या जोडीला प्रशिक्षित मुनुष्यबळही उपलब्ध आहे. जगातील ८५ देशात अशी वैद्यकीय उपकरणे निर्यात करतो. भारतामध्ये झारखंड आणि हरियाना या राज्यात वैद्यकीय उपकरणांची सेवा दिली आहे. त्याचबरोबर ई-हॉस्पिटल संकल्पना राबविली आहे. महाराष्ट्रातही अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधा सामुग्री पुरविण्याची कंपनीची तयारी आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले की, ई-हॉस्पिटल ही संकल्पना चांगली असून आपण दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास करु.

 

 

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *