Breaking News

विप्रोचे नवे सीईओ श्रीनी पलिया ऋषद प्रेमजी यांची माहिती

आयटी क्षेत्रातील प्रमुख विप्रो कंपनीचे सीईओ थियरी डेलापोर्टे, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता विप्रोच्या नवे सीईओ म्हणून श्रीनी पलिया यांची नेयुक्ती करण्यात आली आहे. थिअरी डेलापोर्टे यांनी नेमका कशामुळे विप्रोच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला हे जरी तात्काळ समजू शकले नाही. तरी त्यांनी त्यांची आवड जपण्यासाठी म्हणून विप्रोच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्याची माहिती विप्रोने दिली आहे.

कंपनीचे ऋषद प्रेमजी म्हणाले की, थियरी यांच्या विप्रोमधील नेतृत्वाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. त्यांनी अंमलात आणलेल्या बदलांनी आम्हाला भविष्यासाठी अधिक चांगले स्थान दिले आहे. आम्ही आमची रचना आशादायक अशी निर्माण करत आयटी क्षेत्रात आमचे नेतृत्वही पुढे आणले आहे. तसेच भागीदारींना प्राधान्य दिले आहे आणि आमची एकूण कार्यक्षमता सुधारली आहे. हे श्रीनीला प्रभावीपणे उभारण्यासाठी एक मजबूत पाया प्रदान करेल.

“थियरी मे महिन्याच्या अखेरीपर्यंत त्यांचे काम सुरु ठेवतील आणि त्यानंतर कार्यकाल सुनिश्चित करण्यासाठी श्रीनी आणि माझ्यासोबत काम करतील असेही यावेळी सांगितले.

पलिया हे तीस वर्षांपासून विप्रोसोबत आहेत आणि त्यांनी अलीकडेच विप्रोची सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी धोरणात्मक बाजारपेठ, अमेरिका १ साठी सीईओ म्हणून काम केले आहे. या भूमिकेत, त्यांनी विविध उद्योग क्षेत्रांचे निरीक्षण केले, त्यांची दृष्टीही स्थापित केली आणि वाढीच्या धोरणांची अंमलबजावणी केली, परिणामी या क्षेत्रांमधील बाजार समभाग वाढले. तर श्रीनी विप्रो कार्यकारी मंडळाचे सदस्य राहतील असेही सांगितले.

२०२० मध्ये ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेले डेलापोर्टे कॅपजेमिनी ग्रुपमधून विप्रो कंपनीत दाखल झाले होते.

Check Also

आधार हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात ८ मे रोजी येणार बाजारात

आधार हाऊसिंग फायनान्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बुधवार, ८ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *