Breaking News

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ‘जेलर’ चित्रपट पाहणार Rajinikanth लखनऊमधील काही धार्मिक स्थळांनाही भेट देणार

सुपरस्टार रजनीकांतचा ( Rajinikanth )  ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रजनीकांतसह चित्रपटाची संपूर्ण टीम ‘जेलर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत रजनीकांत हा चित्रपट पाहणार असल्याचे वृत्त आहे. रजनीकांत लखनौला पोहोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत आगामी भेटीबद्दल विचारले असता रजनीकांत म्हणाले, “होय, मी त्यांच्यासोबत माझा ‘जेलर’ चित्रपट पाहणार आहे.” यावेळी त्यांनी जेलरकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि गाडीत बसण्यापूर्वी “हे सर्व देवाचे आशीर्वाद आहे” असे सांगितले. दरम्यान, रजनीकांत केवळ योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चित्रपट पाहणार नसून, लखनऊमधील काही धार्मिक स्थळांनाही भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लखनौला येण्यापूर्वी रजनीकांत रांचीला गेले होते. शुक्रवारी त्यांनी राज्यातील छिन्नमस्तिका मंदिराला भेट दिली. बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले, “खूप छान वाटले. चिन्नमस्तिका मंदिरात गेलो. मी अनेक वर्षांपासून या मंदिराला भेट देण्याचा विचार करत होतो आणि यावेळी मला ते खूप आवडले. मी इथे तिसऱ्यांदा आलो आहे आणि दरवर्षी येईन.”

नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित, “जेलर” मध्ये रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि कॉमेडियन योगी बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात रजनीकांत एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. SacNilk च्या अहवालानुसार, 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 8 दिवसांत 235.65 कोटी कमावले.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *