Breaking News

कृषी

अजित पवार यांचे निर्देश, आवश्यकता असल्यास अतिरिक्त खतांचा साठा मंजूर करा कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. पणन …

Read More »

किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी पहिल्यांदाच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. …

Read More »

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …

Read More »

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केले असून …

Read More »

केंद्राच्या कांदा निर्यात परवानगीमुळे शेतकऱ्यामधील रोष कमी नाहीतर वाढला

किमती आणि पुरवठ्याची चिंता लक्षात घेऊन केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याच्या जवळपास सहा महिन्यांनंतर, गेल्या शनिवारी किमान निर्यात किंमत $५५० प्रति टन आणि वर ४०% आकारणीच्या सावधगिरीने त्यांना ‘फ्री’ श्रेणीत परत आणले. १० दिवसांच्या कालावधीत कांदा निर्यातीवरील हा दुसरा महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल आहे. २५ एप्रिल रोजी, गुजरात फलोत्पादन आयुक्तांनी प्रमाणित …

Read More »

मंत्री पियुष गोयल म्हणाले; मका डाळी कापसासाठी आधारभूत किंमत देण्यास तयार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे

मागील काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतमालाला कायदेशीर हमी भाव द्या या मागणीवरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांबरोबरील सततच्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पाच वर्षांसाठी मका, डाळी आणि कापसासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याची तयारी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी दर्शविली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी पियुष गोयल हे आज बोलत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, ४० टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवरून शेतकऱ्यांना दिवसा वीज

राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्यावर्षी ४० टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा …

Read More »

पशुधनाच्या काळजीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संग्राम जगताप, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी …

Read More »

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, …

Read More »