Breaking News

Monsoon : राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची हजेरी ४ ऑगस्टच्या प्राथमिक अहवालानुसार माहे ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पूर व पावसामुळे शेतीपिके व फळपिकांचे ५८.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे

राज्यात Monsoon मॉन्सून पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण ३५५ तालूक्यांपैकी ० तालुक्यात ० ते २५ टक्के, १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के, १०७ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, १४६ तालुक्यामध्ये ७५ ते १०० टक्के आणि ८९ तालुक्यात १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस ( Monsoon ) झाला आहे.

त्याचप्रमाणे नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, अकोला आणि अमरावती या १५ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के तर रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या १३ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

राज्यस्तरीय पीक परिस्थिती व पिकनिहाय पेरणी अहवाल (खरीप हंगाम-२०२३-२४) मध्ये हा दावा करण्यात आला आहे. ही माहिती १७ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहा पर्यंतची आहे. राज्यात केवळ ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

Monsoon Updates

४ ऑगस्टच्या प्राथमिक अहवालानुसार माहे ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पूर व पावसामुळे शेतीपिके व फळपिकांचे ५८.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. राज्यात खरीप पिकांची सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) १४२.०२ लाख हेक्टर असून १७ ऑगस्ट अखेर १३६.८९ लाख हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच राज्यात खरीप पिकांच्या ऊस पिकासह सरासरी क्षेत्र १५२.९७ लाख हेक्टर असून १३९.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी किंवा लागवड झाली आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *