Breaking News

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबईः प्रतिनिधी
सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे असा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला.
महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यावर मिडियाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी जोरदार टिका केली आहे.
गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलने केली जात आहे. मात्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. ३१ ऑक्टोबरला राज्यातील फडणवीस सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहे. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार असून सरकारच्या पाणी वाचवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण योजना सर्वच फोल ठरल्या आहेत असा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.
लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे हा मोठा प्रश्न सरकार समोर आहे. सरकारचे हे अपयश आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले. खरंतर मागच्या आठवड्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता परंतु भाजप सरकार महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरत आहे. भाजप सरकारला लोकांची नाही तर फक्त निवडणुका जिंकायची चिंता आहे असा गंभीर आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *