Breaking News

Tag Archives: drought out situation in maharashtra

१५१ तालुक्यातील १० वी- १२ वीच्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्यावर थेट होणार जमा शालेय मंत्री अॅड. आशिष शेलार यांचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या १५१ तालुक्यातील १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करताना यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. तसेच ही प्रतिपूर्ती RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी असा निर्णय शालेय …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची दुष्काळी मदत

केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली : प्रतिनिधी  आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आज महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत आज ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण …

Read More »

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या पथकाला विदर्भात न जाण्याचे आदेश राष्ट्र्वादी काँग्रेसचे शरद पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने फक्त मराठवाड्यात पाहणी केली. या चमूला विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने केल्या. त्यामुळे हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही …

Read More »

१५१ दुष्काळी तालुक्यातील पाणी पुरवठ्याची थकबाकी टंचाई निधीतून ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या थकित बिलांवरील दंड-व्याज माफ करण्यात आले आहे. तसेच दुष्काळी तालुक्यांतील व महसूल मंडळातील नोव्हेंबर २०१८ पासून जून २०१९ पर्यंतचे …

Read More »

दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी, असे साकडे घालत आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला असल्याचे प्रतिपादन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचेही …

Read More »

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबईः प्रतिनिधी सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला. महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ …

Read More »

अनेक जिल्हे दुष्काळात असताना फक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा ? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघत आहेत. मात्र सरकार केवळ ८ तालुक्यातच दुष्काळ कसा जाहीर करते, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत असंवेदनशील व शेतकऱ्यांप्रती अनास्था दाखविणारा असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, इतर दुष्काळी तालुक्यांमध्येही …

Read More »