Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. देशाचा एकोपा जो आहे यातील सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष असल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबल्याचा आरोप केला.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आरएसएसशी आमचे मतभेद कायम आहेत. पण मी मोहन भागवतांना विचारतो की, मागील अडीच वर्षांत आपण किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना तुम्ही सांगितलं आहे की, आपण भेटलं पाहिजे, असा सवालही यावेळी मोहन भागवतांना केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील, तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा. कारण, प्रचार करताना भाजपाचा उमेदवार आहे असे सांगितले जात नाही, तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते. त्यामुळे भाजपा संपला असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. ३० टक्के मतदार हा जरांगे पाटील म्हणतील तसे मतदान करणार असल्याचा दावाही यावेळी केला.

Check Also

नांदेडमध्ये आयकर विभागाला धाडीत मिळाली १४ कोटी रूपयांची रोकड, ८ किलो सोने

आयकर विभागाने करचुकवेगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील नांदेडमधील फायनान्स कंपन्यांवर ७२ तासांच्या छाप्यानंतर १४ कोटी रुपये रोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *