Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची सूचक प्रतिक्रिया, भाजपा-आरएसएसने कंपन्यांना काय ऑफर दिली…

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. यामध्ये सर्वांत जास्त लाभ भाजपाला झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस यांचा नंबर दिसून येत आहे. या सर्व घडामोडीवर माध्यमांवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंगवर नोंदवली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, केंद्र सरकारची २०१८ ची इलेक्टोरल बाँड्स योजना देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे; भाजपने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून एकूण ६ हजार ६० कोटी रुपये कमावल्याची टीका केली आहे. तसेच, आता भाजप-आरएसएस सरकारने कंपन्यांना इलेक्टोरल बाँड्ससाठी काय ऑफर दिली हे पाहणे मनोरंजक ठरणार असल्याचेही सांगितले.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपा आणि मोदी सरकारची पोलखोल करताना, निव्वळ नफ्यामध्ये २१५ कोटी असलेल्या कंपनीने १ हजार ३६८ कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणे कसे शक्य आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, निव्वळ नफ्यामध्ये फक्त १० कोटी असलेल्या आणखी एका कंपनीने १८५ कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोंचू मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि त्यांच्या भ्रष्ट गुंडांना तुरुंगात टाकले पाहिजे अशी मागणीही केली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *