Breaking News

राहुल नार्वेकरांचे निकाल वाचनः दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार पात्र, पण पक्ष अजित पवारांचा

डिसेंबर २०२३ च्या अखेरीस शिवसेना पक्षातील फुटीच्या दाव्यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला अधिकृत पक्षाची मान्यता देत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असल्याचा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा मुळ पक्ष नसल्याचा निकाल दिला. मात्र दोन्ही गटाच्या आमदारांनी परस्पराच्या विरोधी गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत मागणी केली. मात्र दोन्ही गटातील आमदार अपात्र ठरविले नाहीत. याच निकालाच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या बाबत अगदी सेम टू सेम निर्णय देत या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरविले. तसेच पक्ष ही अजित पवार यांच्या नेतृत्वखालील मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यामुळे या दोन्ही निकालाबाबत एकप्रकारची “सेटींग” असल्याचे अप्रत्यक्ष दिसून येत आहे.

यासंदर्भात मराठी ई-बातम्या संकेतस्थळाने केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकाला संदर्भात दिलेल्या आदेशाची कारण मिमांसा करताना शिवसेनेबाबत दिलेला निकाल पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीसंदर्भातही वापरता येणार असल्याचे भाकित त्याचवेळी आमच्या वृत्तामध्ये स्पष्ट केले होते.

हे ही वाचाः-

अजित पवार + एकनाथ शिंदे- शरद पवार = शिवसेना उबाठा; कॉपी पेस्ट

त्यानुसार अजित पवार गटाला मूळ पक्ष आणि पक्ष चिन्ह देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पुराव्याचा प्रामुख्याने आधार घेतला तशाच पध्दतीच्या पुराव्यांचा आधार आणि तशीच कार्यपध्दती आधीच्या शिवसेना पक्षाच्या संदर्भात स्विकारली. त्याच कार्यपध्दतीचा आणि पुराव्यांच्या आधाराचा वापरही शिवसेनेतील फुटीर गटांसोबत केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट हा मुळचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. अगदी त्याच पध्दतीने अजित पवार गटालाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ पक्ष चिन्ह आणि पक्षाचा दर्जाही दिल्याचे पाह्यला उपलब्ध निकाल पत्रानुसार दिल्याचे पाह्यला मिळाले.

हे ही वाचाः-

विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णयः शिवसेना सगळी शिंदे गटाचीच

विशेष म्हणजे ज्या १० परिशिष्टनुसार आमदार अपात्रेवर निर्णय देताना मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्या आधारावर दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र कसे ठरविले याचाच शोध अनेक कायदेतज्ञांकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार जसे पात्र ठरले त्याच आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या आमदारांनाही पात्र ठरविण्यात आले. मात्र त्यासाठी ‘डिसप्युट’ आणि ‘डिसेंट’ या शब्दांचा आधार दोन्ही पक्षांच्या आमदारांबाबत कसा होता यावरच अनेक कायदे तज्ञांमध्ये चर्चा सुरु आहे.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *