Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर बंदी घालत शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यासाठी मोठमोठाले बॅरिकेडस आणि टोकदार खिळे, आणि रस्त्यात भाल्यासारखे टोकदार खिळे बसविले. या सगळ्या पार्श्वभूमीवर शंभू सीमेवर पोलिस-निमलष्करी दलाच्या जवान आणि शेतकऱ्यांमध्ये झडप झाली. त्यामुळे दिल्लीत येणाऱ्या सीमा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

या सगळ्या घडामोंडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता छत्तीसगड राज्यातील सुरगुजा जिल्ह्याच्या मुख्यालयाजवळ पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर झालेल्या जाहिर सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी चलो दिल्ली या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत म्हणाले की, जर केंद्रात पुन्हा एकदा आमचे काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत कायदेशीररित्या मिळवून देणार असल्याची गॅरंटी दिली.

यावेळी मल्लिकारजून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवित म्हणाले, सध्या देशात सगळीकडे नरेंद्र मोदी हे गॅरंटी देत फिरत सुटले आहेत. परंतु त्यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले.

तसेच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने छत्तीसगड येथे आलो असून येथूनच शेतकऱ्यांच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनाबाबत एक घोषणा मला करायला आवडेल असे सांगत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कायदेशीर मार्गाने किमान आधारभूत किंमत मिळवून देण्याची मी गॅरंटी देतो. जर आगामी लोकसभा निवडणूकीत आमचा पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास इंडिया आघाडीची शेतकऱ्यांच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत मिळवून देण्याची आमची पहिली प्राथमिकता आणि पहिली गॅरंटी राहणार असल्याची घोषणाही यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *