Breaking News

गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारे ते तिघे कोण ? आरक्षणासाठी यातील एकाने जाळली होती स्वतःची गाडी सदावर्ते यांची फुल्ली ऑक्टोमॅटिक गाडी फोडणारे ते तीन मराठा आंदोलक कोण ?

मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची पहाटे सकाळी मराठा आंदोलनकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे तसेच सदावर्ते यांच्या इमारतीबाहेर पोलिसांची गाडी सुद्धा उभी करण्यात आली आहे.

प्रथमदर्शी यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सदावर्ते यांची गाडी फोडल्या प्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू सावे या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये तोडफोडीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे, वसंत पाथ्रीकर यांच्यासह तिघांनी गाडीची तोडफोड करून एक मराठा लाख मराठा….छत्रपती शिवाजी महाराज की जय.. घोषणा दिल्या.

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे आणि त्यांचे सहकारी पाथ्री येथील वसंत पाथ्रीकर या दोघांचे मराठा आरक्षणासाठी सातत्याने एकापाठोपाठ आंदोलन सुरूच आहे. यापूर्वी मंगेश साबळे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने संतप्त होऊन भर रस्त्यात आपली स्वतःची नवी कोरी कार जळवून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. सोशल मिडीयावर त्यांचे स्वतःची कार पेटवून दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *