Breaking News

या आठवड्यात पाच कंपन्यांचे आयपीओ उघडणार पाच कंपन्यांची नावे याप्रमाणे

चालू आठवड्यात काही कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची आणखी एक संधी असेल. एक मेनबोर्ड आणि चार एसएमई असे पाच आयपीओ या आठवड्यात खुले होणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातूनकंपन्या ९३८ कोटी रुपये उभारणार आहेत.

ब्लू जेट हेल्थकेअर आयपीओ
ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ २५ ऑक्टोबरला उघडेल आणि २७ ऑक्टोबरला बंद होईल. आयपीओसाठी ३२३-३४६ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केली आहे. कंपनी आयपीओतून ८४० कोटी रुपये उभारणार आहे. लॉट आकार ४३ शेअर्सचा आहे. आयपीओमध्ये २.४२ कोटी शेअर्स विकले जातील. एकूण शेअर्सपैकी ५० टक्के संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

एसएमई आयपीओ
या आठवड्यात चार एसएमई आयपीओ उघडणार आहेत. यामध्ये पॅरागॉन फाईन, शांतला एफएमसीजी उत्पादने, मैत्रेय मेडिकेअर आणि ऑन डोर कॉन्सेप्ट यांचा समावेश आहे. पॅरागॉन फाईनचा आयपीओ २६ ऑक्टोबरला उघडेल आणि ३० ऑक्टोबरला बंद होईल.

शांतला एफएमसीजी आणि ऑन डोर कॉन्सेप्ट आयपीओद्वारे अनुक्रमे १६ कोटी आणि ३१ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. शांतला एफएमसीजी आयपीओ २७ ऑक्टोबर उघडेल. तर ऑन डोर कॉन्सेप्ट आयपीओ २३ ऑक्टोबर रोजी खुला होईल. मैत्रेय मेडिकेअरच्या आयपीओमध्ये १८.१६ लाख शेअर्स विकले जाणार आहेत. हा आयपीओ २७ ऑक्टोबर रोजी उघडेल आणि १ नोव्हेंबर रोजी बंद होईल.

Check Also

बायजूसने वार्षिक शुल्कात केली ३०-४० टक्के कपात विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार इन्सेटीव्ह

एडटेक कंपनी थिंक अँड लर्न, प्रख्यात बायजू ब्रँडची मूळ कंपनी, अलीकडेच अहवालानुसार, अभ्यासक्रम सदस्यता शुल्क …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *