Breaking News

एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर दुसऱ्या तिमाहीत १५,९७६ कोटींचा निव्वळ नफा

एचडीएफसी बँकेने सोमवारी (१६ ऑक्टोबर) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले. एचडीएफसी बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५०.६ टक्के वाढून १५,९७६.११ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने १०,६०९५.७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.

दुसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ७८,४०६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत उत्पन्न ४६,१८१ कोटी रुपये होते. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर ३०.२७ टक्के वाढून २७,३८५.२३ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २१,०२१.१६ कोटी रुपये होते.

बँकेचा एकूण एनपीए १.१७ टक्क्यावरून १.३४ टक्क्यापर्यंत वाढला आहे. तर निव्वळ एनपीए ०.३० टक्क्यावरून वरून ०.३५ टक्क्यापर्यंत वाढला. यासह, बँकेची तरतूद वार्षिक आधारावर १०.३ टक्के घटून २,९०३ कोटी रुपये झाली आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण मालमत्तेवर बँकेचे मूळ व्याज मार्जिन ३.६५ टक्के होते. बँकेचा प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग नफा (PPOP) मागील वर्षीच्या याच तिमाहीत १७,३९२ कोटी रुपयांवरून ३०.५ टक्के वाढून २२,६९४ कोटी रुपये झाला आहे.

एचडीएफसी बँकेचा शेअर्स सोमवारी ०.४० टक्क्यांच्या घसरणीसह १५२९.६० रुपयांवर बंद झाला. एचडीएफसीमध्ये विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेच्या शेअरची चमक नाहीशी झाली होती. एका महिन्यात ८ टक्के, तीन महिन्यांत ७ टक्के आणि ६ महिन्यांत १० टक्क्यांनी शेअर घसरला आहे.

Check Also

भारत आणि इराण सोबत चाबहर बंदराच्या अनुषंगाने द्विपक्षिय करार १२० कोटी रूपयांची गुंतवणूक भारताकडून इराणमध्ये

भारत आणि इराण यांच्यात सोमवारी चाबहार बंदराच्या कामकाजासंबंधी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीकोनातून इराण आणि भारता दरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *