Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्रला दुसऱ्या तिमाहीत ९२० कोटींचा नफा दुसऱ्या तिमाहीतही नफा

सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा ७२ टक्क्यांनी वाढून ९२० कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने ५३५ कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा कमावला होता.

व्याज उत्पन्नात वाढ आणि बुडीत कर्जे कमी झाल्याने बँकेचा नफा वाढला आहे. तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ५,७९६ कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा ४,३१७ कोटी रुपये होता.

जुलै – सप्टेंबर तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढून ५,०६८ कोटी रुपये झाले. एका वर्षापूर्वी याच कालावधीत निव्वळ व्याज उत्पन्न ३,८१५ कोटी रुपये होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव म्हणाले की, बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन सप्टेंबरच्या तिमाहीत वाढून ३.८९ टक्के झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत ३.५५ टक्के होते.

दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचा एकूण एनपीए कर्जाच्या २.१९ टक्क्यांवर आला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत एकूण एनपीए ३.४० टक्के होता. त्याचप्रमाणे बँकेचा निव्वळ एनपीएही ०.६८ टक्क्यांवरून ०.२३ टक्क्यांवर आला आहे.

सोमवारी बीएसईवर बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर्स १.२६ टक्क्यांच्या वाढीसह ४७.४२ रुपयांवर बंद झाला. तर एनएसईवर शेअर्स १.३९ टक्क्यांच्या वाढीसह ४७.४५ रुपयांवर स्थिरावला. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५१.९० रुपये आहे, जो 4 ऑक्टोबर २०२३ रोजी झाला होता.

Check Also

पतंजली फूड्सने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला हा निर्णय नॉन फूड्स प्रकल्प खरेदी करण्याचा निर्णय

पतंजली फूड्सने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने २६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पतंजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *