Breaking News

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका घेत गाझा पट्ट्यातून झालेला हल्ला युद्धाची चाहूल असल्याचे म्हटले.

पॅलेस्टाईने इस्रायलवर हल्ला का केला ?

हा हल्ला गाझावरील इस्रायलने लादलेली १६ वर्षांच्या नाकेबंदी, गेल्या वर्षभरात वेस्ट बँक शहरांमध्ये झालेले इस्त्रायली छापे, अल अक्सा येथील हिंसाचार, पॅलेस्टिनींवर वाढते हल्ले यांना हमासने आपल्या पद्धतीने दिलेले प्रत्युत्तर होते’, असे पॅलेस्टाईनचे लष्करी कमांडर मोहम्मद डेफ याने म्हटले आहे. तसेच मोहम्मद डेफ याने ‘आता पुरे झाले’, असा इशाराही इस्रायल सरकारला दिला होता. शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्याला पॅलेस्टाईने ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ नाव दिले असून पूर्व जेरुसलेमपासून उत्तर इस्रायलपर्यंतच्या पॅलेस्टिनींना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन त्याने केले.

‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ म्हणजे नेमकं काय ?

असा दावा केला जात आहे की मे २०२१ मध्ये रमजानच्या दरम्यान इस्रायलने अल अक्सा मशिदीवर हल्ला केला, मशिदीतून वृद्ध आणि तरुणांना ओढून नेले या घटनेने मोहम्मद दाईफला खूपच विचलित केले. परिणामी इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्याचा आरोप इस्रायलवर झाला. आता त्या मास्टरमाईंडचा भूतकाळ समजून घेऊया, याच आधारावर इस्रायलवरील सर्वात मोठ्या प्राणघातक हल्ल्याची संपूर्ण आखणी तयार करण्यात आली होती. असेही बोलले जाते की, पॅलेस्टाईन लष्करी शाखेचा मुख्य कमांडर मोहम्मद दाईफ याने ही योजना आखली होती, जी इतकी गुप्त होती की मोसादलाही याची कल्पना नव्हती.

मोहम्मद दाईफ यांचा जन्म १९६५ मध्ये गाझामधील खान युनिस निर्वासित शिबिरात झाला होता.

– भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर तो 1987 मध्ये हमासमध्ये सामील झाला होता.
– सध्या तो हमासच्या मिलिटरी विंग इज्ज अद-दीन अल-कसाम ब्रिगेडचा मुख्य कमांडर आहे.
– इस्रायली हत्याकांडाचा सूत्रधार मोहम्मद दाईफ याने या रक्तरंजित खेळाला ‘ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म’ असे नाव दिले आहे… ५७ वर्षीय मोहम्मद दाईफ स्वतः व्हील चेअरवर राहतो…
– एका हल्ल्यात मोहम्मद दाईफ यांचा डोळा गमवावा लागला आणि दुसऱ्या हल्ल्यात हाताला दुखापत झाली… २०१४ मध्ये इस्रायली हल्ल्यात त्यांची पत्नी आणि दोन मुले मारली गेली…
– अमेरिकेने ८ सप्टेंबर २०१५ रोजी मोहम्मद दाईफचा जागतिक दहशतवादी यादीत समावेश केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

तेंडूलकर, चोप्राला उत्तर मागत आणखी एक खेळाडू पद्मश्री पुरस्कार परत करणार

अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सरण शर्मा यांचे जवळचे मित्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *