Breaking News

फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’चं आयोजन; मात्र १५६ तरुण गरबा कार्यक्रमाला पोहोचलेच नाहीत ! फाल्गुनी पाठक गरबा कार्यक्रमाच्या पासच्या आमिषाने १५६ तरुणांची फसवणूक

गायक फाल्गुनी पाठक यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नवरात्रौउत्सवानिमित्त मुंबई येथील बोरीवली याठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’मध्ये सहभागी होण्यासाठी ४५०० रुपयांचे पास होते. याच गोष्टीचा फायदा घेत १५६ तरुणांना स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहे.

प्रकरण असे की, संपूर्ण मुंबईमध्ये फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाची धूम आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी पास साठी पैसे खर्च करत असतात. मात्र कांदिवली याठिकाणी राहणाऱ्या युवकाला माहिती पडलं की बोरीवली येथे फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’चे पास विक्री करणारा अधिकृत विक्रेता आहे. अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करत विशाल शाह हा इसम या कार्यक्रमाचे कमी दरात पास विक्री करत होता.

फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’च्या एका पासची किंमत ४ हजार ५०० रुपये होती. पण विशाल शाह याच्याकडे तरुणाला फक्त ३ हजार ३०० रुपयांमध्ये पास मिळत होते.पास कमी किंमतीत मिळत असल्यामुळे तरुणाने त्यांच्या अन्य मित्रांना देखील माहिती दिली. असं करत तरुणाने १५६ लोकांना पास खरेदी करण्यासाठी तयार केलं. त्यानंतर सर्वांनी पैसे गोळा केले.

विशाल शाह यांनी १५६ तरुणांना एका ठराविक ठिकाणी पोहोचण्यास सांगितले. त्याठिकाणी एक दुसरा व्यक्ती पास घेवून येणार होता. पण तो व्यक्त पास घेवून आलाच नाही. तरुणांनी बराच वेळ प्रतीक्षा केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तरुणांने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणामुळे आता एकाच खळबळ उडाली आहे.

 

Check Also

मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा २०, २१ फेब्रुवारीला

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *