Breaking News

मृत्यू कसा आणि कधी झाला याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी न्यायवैद्यक शास्त्राकडे मुलींनी मागे न पडत करियर म्हणून पाहावे; डॉ. सारा हिनावी यांचा सल्ला

 

अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा निर्जल स्थाळी बेवारस मृतदेह सापडतात अशा मृतदेहाची कधी-कधी ओळख पटवणे पोलिसांसह फॉरेन्सिकचे टीमला सुद्धा कठीण जाते मात्र यावर संशोधन करणाऱ्या डॉ सारा हिनावी यांनी यावर संशोधन करून मृतदेहाची ओळख पटण्यासंदर्भातील प्रक्रियेवर संशोधन करून आपल्या संशोधनाचा जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत असून एकीकडे किळसवाणे वाटणारे काम त्या आज महिला असूनही करत आहे.

या संदर्भात बोलताना सारा हिनावी म्हणाल्या की अनेकदा निर्जन स्थळावर वा अन्य कोठेही बेवारस मृतदेह सापडतात, अपघातातील मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेतील असतात. आम्हाला कधीकधी घटनास्थळीही जावे लागते. पोलिसांशी संबंध येतो, पण मला माझे काम खूप आवडते. मी मनापासून हे काम करते. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी या विषयात करिअर करायचे निश्चित केले होते असे त्या उत्साहाने सांगत असतात. शवविच्छेदन करणाऱ्या त्या महिला डॉक्टर असून, सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.

डॉ. हिनावी पुढे सांगतात, जिवंत व्यक्ती आपल्याला काय दुखापत झाली आहे वगैरे सांगू शकतात. मात्र, मृत व्यक्ती तिने अखेरचा श्वास कसा घेतला, हे सांगू शकत नाही. आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस या गुन्ह्यातील असतात. संबंधित व्यक्तीची हत्या झालेली असते. त्या व्यक्तीचा मृत्यू कसा आणि कधी झाला, याचा शोध आम्ही शास्त्रीय पद्धतीने घेतो आणि त्याची माहिती पोलिसांना देतो. आम्ही दिलेल्या अहवालावरून पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त होतात.

मुंबईकर असलेल्या डॉ. हिनावी यांचे एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील भारती विद्यापीठात झाले असून, पदव्युत्तर शिक्षण नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. न्यायवैद्यक शास्त्रात करिअर करण्याचे त्यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातच निश्चित केले. २०१५ ते २०१८ या कालावधीत त्यांनी फॉरेन्सिकचे शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. तसेच मुलींनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे मत डॉ. हिनावी व्यक्त केले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *