Breaking News

उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकारीणीचा विस्तार: या नव्या नेत्यांची वर्णी मनोहर जोशींची नेतेपदी नियुक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पडझडीनंतर उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकारिणीत नेते, उपनेते आणि संघटक आणि सचिव अशा नियुक्त्या जाहीर यात अडगळीत पडलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना नेतेपदी संधी देण्यात आली असून विस्तारात खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, रवींद्र वायकर आणि आमदार प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती आली करण्यात आहे. नव्या कार्यकारिणीत युवा सेनेच्या ३ पदाधिका-यांची सचिवपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामध्ये वरूण सरदेसाई यांचा समावेश आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत नेते, उपनेते आणि संघटक आणि सचिव अशा नियुक्त्या जाहीर आहेत.राज्यातील करण्यात आल्या पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू(मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीआहे.

युवा सेनेचे असलेले वरूण सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर) शुभांगी पाटील (नाशिक) जान्हवी सावंत (कोकण) छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते (मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत नेते म्हणून एकूण १६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल

कार्यकारिणीत नेते म्हणून एकूण १६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *