Breaking News

कार्डची झंझट संपली, आता यूपीआयद्वारे एटीएममधून काढता येणार पैसे ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित

आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) वरूनही रोख रक्कम काढता येईल. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम (UPI ATM) प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढता येतात.

यूपीआय एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. यूपीआय एटीएम नेहमीच्या एटीएम मशिनप्रमाणे काम करेल. यूपीआय एटीएम सध्या फक्त BHIM UPI अॅपला सपोर्ट करते, पण लवकरच Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या इतर अॅप्सवर लाइव्ह होईल. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या टप्प्यात आणले जात आहे.

यूपीआय एटीएम वापरण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज भासणार नाही. याच्या मदतीने तुम्ही कार्डशी संबंधित फसवणुकीपासूनही सुरक्षित राहाल. येथे कोणताही कार्ड नंबर किंवा पिन नंबर टाकण्याची गरज नाही. यूपीआय एटीएमकडे कार्ड स्किमिंगसारख्या आर्थिक फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी एक सकारात्मक उपाय म्हणून पाहिले जाते.

जपानी कंपनी हिताचीनेही असे एटीएम बनवले आहे. या एटीएमला ‘मनी स्पॉट यूपीआय एटीएम’ असे नाव देण्यात आले आहे. देशभरात ३००० हून अधिक ठिकाणी त्यांचे एटीएम आहेत. या एटीएम मशीनची मालकी, देखभाल आणि ऑपरेशनची जबाबदारी नॉन-बँकिंग सेवा प्रदात्याकडे असते त्यांना WLA म्हणतात.

गेल्या वर्षी १९ मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआयद्वारे रोख पैसे काढण्याच्या सुविधेबद्दल माहिती देणारे परिपत्रक जारी केले होते. परिपत्रकात, आरबीआयने म्हटले होते की सर्व बँका, एटीएम नेटवर्क आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) यांनी त्यांच्या एटीएममध्ये ‘इंटर-ऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल’ (ICCW) सुविधा प्रदान करावी.

Check Also

भारत आणि इराण सोबत चाबहर बंदराच्या अनुषंगाने द्विपक्षिय करार १२० कोटी रूपयांची गुंतवणूक भारताकडून इराणमध्ये

भारत आणि इराण यांच्यात सोमवारी चाबहार बंदराच्या कामकाजासंबंधी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीकोनातून इराण आणि भारता दरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *