Breaking News

महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारणार सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची घोषणा

रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय उभारण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेतांना बोलत होते. बैठकीस आमदार प्रविण दरेकर, अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय कंदेवाड, विजय बावीस्कर आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील परसुळे (ता. पोलादपूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात निधीची उपलब्धता आणि कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत आशा कार्यकर्त्या यांना विमा संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच 18 वर्षावरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम, आपला दवाखाना रूग्णसंख्या व सद्यस्थिती, खरेदी प्राधिकरण, धर्मदाय रूग्णालय ॲप, आरोग्य विभागाचे नविन मंडळ कार्यालय स्थापन करणे आदीं विषयांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *