Breaking News

शरद पवार यांचे आव्हान, पंतप्रधानांनी नुसतेच आरोप करण्याला काय अर्थ… अजित पवार सोडून गेलेल्यावर केले भाष्य

आज इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने बैठकीशी संबधित चर्चेची रूपरेखा आणि तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यावरून अद्यापही संशय असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांचे भोपाळ येथील भाषण ऐकले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सिंचनाचे, बॅकेशी संबधिक काही आरोप केले. तसेच ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हणाले. पंतप्रधानांकडे सगळ्या चौकशी यंत्रणा आहेत. तर त्या मार्फत चौकशी करून त्यातील सत्य नेमके काय आहे याची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी करत अन्यथा पंतप्रधानांनी नुसतेच हवेत आरोप करण्याला काय अर्थ आहे असे एकप्रकारचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत अजित पवार यांनाही टोला लगावला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, इंडियातील सहभागी पक्षांकडून देशभरात एकत्रित निवडणूका लढविण्याच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यासंदर्भात दोन दिवस होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल त्यानंतर झालेल्या निर्णयाची माहिती सर्वांना देऊ असेही स्पष्ट केली.

त्याचबरोबर सोडून गेलेल्या सहकाऱ्यांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, जे गेलेत त्यांच्याबाबत येत्या निवडणूकीत लोक योग्य तो निर्णय घेऊन त्यांची जागा दाखवून देतील असे सांगत अजित पवार गटाच्या बाहेर पडण्यावर भाष्य केले.

तसेच यावेळी माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन पक्षासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला असता शरद पवार म्हणाले, मायावती या कोणत्या बाजूने जाणार याबाबत अद्याप त्यांनी स्पष्ट केले नाही. त्या त्यांच्याशी बोलत आहेत. इंडियाशी बोलत आहेत. त्यामुळे त्या जोपर्यंत अधिकृत भूमिका जाहीर करणार नाहीत. तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही. त्यांना सोबत घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच राहतील असेही स्पष्ट केले.

तसेच जागा वाटपाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, एकत्रित जागा लढविणार आहोत. पण त्या जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर कोणत्या पक्षांशी संवाद साधायचा याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *