Breaking News

संभाजी भिडे व मणिपूर हिंसाचाराविरोधात चेंबूरमध्ये भीम आर्मीची आक्रोश रॅली विविध संघटनांचा सहभाग

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसह मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भीम आर्मी या संघटनेने उद्या गुरुवारी (३ ऑगस्ट )चेंबूर येथे दुपारी ४ वाजता आक्रोश रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीत ख्रिस्ती संघटनांसह विविध महिला व सामाजिक संघटनांचाही सहभाग असणार आहे .

महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी या महान पुरुषांविषयी तसेच साईबाबा यांच्या विषयी संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहि या वक्तव्यअगोदर भिडे यांनी १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्यदिनासंदर्भात देखील आक्षेपार्ह वक्तव्य केले १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस नसून तो काळा दिवस आहे हा दिवस कला दिवस म्हणून साजरा करावा असे वक्तव्य भिडे यांनी केले होते यासंदर्भात भिडे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावं अशी मागणी भीम आर्मीने केली आहे

मणिपूर येथे महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याप्रकरणी संबंधितांविरोधात कठोर शासन करावे मुख्यमंत्री बीरेन यांनी राजीनामा द्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, हिंसाचारात बळितांच्या कुटुंबियांना २५ लाखांचे आर्थिक सहाय्य्य करावे हिंसाचार करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर शासन करावे तसेच जाळण्यात आलेल्या घरांचे शासकीय स्तरावर पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्या भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी केले आहे
सदर मागण्यांसाठी उद्या गुरुवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता डायमंड गार्डन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन अशी आक्रोश रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीला महिला संघटना ,सामाजिक संघटना व ख्रिस्ती संघटनांनी पाठिंबा दिला असून देशप्रेमी जनतेनेही मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन गरुड यांनी केले आहे.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *