Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी…आम्ही ८ महिन्यापूर्वी चुक दूरूस्त त्यामुळेच काहीजणांना परदेशात जाऊन देशाविरोधात वक्तव्ये करावे लागत आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यासाठी काल शनिवारी रात्री लखनौ विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आज ९ एप्रिल रोजी त्यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. तसेच या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अ‍ॅलर्जी होती, अनेकांना या दौऱ्यामुळे त्रासही झाला. त्यांनी टीका केली. परंतु अयोध्या हा आमच्या आस्थेचा विषय आहे, हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दौऱ्याचा काहींना त्रास झाला, कारण त्यांना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर सर्वांच्या घराघरात, मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भीतीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आले आहेत.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, २०१४ मध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही सरकार बनवलं. २०१९ लाही तेच होणार होतं. परंतु स्वार्थ आणि खुर्चीच्या लालसेपोटी त्यांनी अर्थात उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत चुकीचं पाऊल उचललं. परंतु आठ महिन्यांपूर्वी आम्ही ती चूक सुधारली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या लोकांना लांब ठेवलं, त्यांच्यासोबतच यांनी सरकार बनवलं होतं. बाळासाहेबांच्या विचारांशी दगा केला. परंतु आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन ती चूक सुधारली. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्य मिळाला आणि शिवसेना हे नावही मिळालं.

या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटावर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अ‍ॅलर्जी होती, अनेकांना या दौऱ्यामुळे त्रासही झाला. कारण त्यांना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर लोकांच्या मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीपोटी ते हिंदुत्वाला विरोध करत असतात.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांना सावरकरांचा अपमान करण्याबरोबर हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हिंदुत्व जर सगळ्यांच्या घराघरांत पोहोचलं तर त्यांचं (राहुल गांधी) कायमस्वरुपी दुकान बंद होईल. त्यांचं दुकान बंद होणारच आहे. कारण त्यांचा आकडा आता ४०० वरून ४० वर आला. त्यांनी मोदींवर आरोप केले. मोदींवर ज्यांनी ज्यांनी आरोप केले, त्यांची परिस्थिती काय झाली आहे? हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. काही लोक बाहेरच्या देशात जाऊन मुद्दाम आणि जाणीवपूर्वक आपल्या देशाची बदनामी करत आहेत. हा खऱ्या अर्थाने एकप्रकारचा देशद्रोह आहे.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *