Breaking News

विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल रमेश गोवेकर, सत्यजित भिसे, बाळा यांच्या हत्या प्रकरणांचे सत्य समोर आणायचं असेल तर

राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा विरूद्ध शिवसेना आणि आता भाजपा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात एकमेकांच्या विरोधातील कुरघोड्या संपता संपत नाहीत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सतत झडत असतात. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, आता रमेश गोवेकर, सत्यजित भिसे, बाळा यांच्या हत्या प्रकरणांचे सत्य समोर आणायचं असेल तर आणि या सगळ्यांच्या हत्येच्या खोलाशी जायचं असेल तर नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा असे आवाहन केले.

तसेच नारायण राणे यांची नार्कोटेस्ट केली तर अंकुश राणेला कुठे मारलं, कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील, असा दावाही विनायक राऊत यांनी केला.
विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि त्यांचे सुपत्र आमदार नितेश राणे नौटंकी करणाऱ्या या भाजपाच्या नेत्यांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही अशी टीका करत हे असेच गल्लीबोळात बरळत राहतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

नोटबंदी प्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत. नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला. आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णया विरोधात लोकभावना आहेत.

वैभव नाईक यांनीही नितेश राणे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, नितेश राणे यांनी यापुर्वी अनेकदा नथुराम गोडसेच्या विरोधात बोलायचे त्यांच्यावर टिका करायचे. आता नथुराम गोडलेचे गोडवे गात आहेत. मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या भूमिका बदलत आहेत. पण त्यांनी कितीही अजित पवार यांच्यावर बोलले, आदित्य ठाकरें विरोधात बोलले तरी भाजपा नितेश राणें यांना कधी ही मंत्री करणार नसल्याचे दावा केला.

शिंदे गट आणि भाजपाला आदित्य ठाकरेंनी चांगलाच घाम फोडला आहे. ज्या पद्धतीने सर्वजण आदित्य ठाकरेंना टार्गेट करता आहेत. त्यातच आदित्य यांचा विजय आहे. महाराष्ट्रातील जनता, तरुण, सर्व शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *