Breaking News

ज्योतिषाकडे हात दाखविल्यावरून मुख्यमंत्री म्हणाले, ज्याला दाखवायचाय होता त्याला…

काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द करत शिर्डी दौऱ्यावर गेले. तसेच साईबाब मंदीरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एका ज्योतिषाकडे जात आपला हात दाखविल्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला. त्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका होत असून राज्यानेच केलेल्या अंधश्रध्दा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपलं कसं आहे जे करायचं ते सगळं उघडं करायचं. ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना ३० जूनलाच हात दाखवला असे सांगत विरोधकांवर पलटवार केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कामाख्या देवीला जाणार आहे हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन सरकार स्थापन केलेलं आहे. कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही. आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. लपूनछपून करत नाही, दिवसाढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.

याचबरोबर हात दाखवण्याचा विषयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्याबरोबर आले. जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते कुणाचं काम करत होतं. कुणासाठी सरकार चालवलं जात होतं. ते सर्वसामान्यांना मान्य नव्हतं म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. हात आम्ही ३० जूनलाच ज्यांना दाखवायचा होता त्यांना दाखवलेला आहे, चांगला हात दाखवला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी शिर्डी दौऱ्यावर असताना सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिर केले सुधारीत परिक्षेचे वेळापत्रक राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *