Breaking News

लोककला आणि वाद्य सर्व्हेसाठी किती खर्च झाला ? हिशोब देण्याची जयंत पाटील यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी

महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य यांचे सर्व्हे आणि संशोधनासाठी सरकारने किती खर्च केला याचा हिशोब दया .अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं

आज सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात संबंधित मागणी केली.

महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्यांची नोंद होण्यासाठी त्याचा सर्व्हे आणि संशोधन करण्यासाठी सन २०१५च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य याचे जतन होण्यासाठी या योजनेसाठी पंचाहत्तर लाख रुपयाचा निधीची तरतूद केली.पण आता पर्यंत या सर्व्हेवर किती खर्च झाला हे सभागृहाला सांगावे.असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

माझ्या माहिती प्रमाणे सांस्कृतिक कार्य खात्याने यासाठी वीस लाख रुपयाची उधळपट्टी केली,त्याचा हिशोब सभागृहाला दयावा .असेही जयंत पाटील यांनी सरकारकडे मागणी केली.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *